हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed deposits : RBI ने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहेत. आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही महाराष्ट्रातील एकमेव अशी स्मॉल फायनान्सिंग बँक आहे जिला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स दिले गेले आहे.
एफडीवरील हे नवीन व्याजदर 6 जूनपासून लागू होतील, अशी माहिती बँकेने आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात दिली. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 999 दिवसांच्या कालावधीसाठीच्या 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.99 टक्के व्याज दर दिला जात आहे. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनाच हा व्याजदर मिळेल. Fixed deposits
एफडीवर सर्वाधिक व्याज देणारी ही बँक आहे. इतर सर्व बँकांमध्ये यापेक्षा कमी व्याजदर दिला जातो. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आताही एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. असे मानले जात आहे की, महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI कडून पुन्हा रेपो दरात वाढ केली जाऊ शकेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेला भेट देता येईल किंवा 1800-266-7711 या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवता येईल. हे लक्षात ठेवा की, बँकाकडून या व्याजदरात वेळोवेळी बदल केले जातात. Fixed deposits
2 कोटींवरील Fixed deposits वर किती व्याज दिला जात आहे जाणून घ्या
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.75 टक्के
15 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.75 टक्के
46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
91 दिवस ते 6 महिने : सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
6 महिने ते 9 महिन्यांपेक्षा जास्त: सामान्य लोकसंख्येसाठी – 5.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के
9 महिन्यांपेक्षा जास्त ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकसंख्येसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
1 वर्ष 6 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकसंख्येसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
2 वर्षांहून अधिक ते 998 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
999 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.49 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.99 टक्के
1000 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.80 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
5 वर्षांसाठी: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
5 वर्षे किंवा त्याहून अधिक ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के Fixed deposits
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.suryodaybank.com/deposits/fixed-deposit/rate-of-interest
हे पण वाचा :
Upcoming cars : इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!
EPFO : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
Maruti Brezza ची ‘ही’ नवीन कार लवकरच होणार लॉंच; दमदार पॉवर आणि मायलेजही
HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!
Gold Price Today : सोने महागले तर चांदीमध्ये झाली घट, आजचे नवीन दर पहा