Flipkart UPI : Flipkart ने लाँच केली UPI सेवा; PhonePe, Amazon Pay UPI ला देणार टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipkart UPI : देशातील प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Flipkart ने UPI सर्व्हिस सुरु केली आहे. यासाठी कंपनीने ॲक्सिस बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता तुम्ही Flipkart वरून एकमेकांना पैसे पाठवू शकता, ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करू शकता तसेच घराचे वीजबिल सुद्धा भरू शकता. याशिवाय व्यावसायिक दुकानदार फ्लिपकार्टचा QR कोड बनवून दुकानात ठेऊ शकतात. या नव्या सुविधेमुळे फ्लिपकार्टच्या ग्राहकांना शॉपिंग पेमेंट करण्यासाठी थर्ड-पार्टी पेमेंट अ‍ॅपवर अवलंबून रहावं लागणार नाही.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “फ्लिपकार्ट ॲपवर, फ्लिपकार्ट UPI चा वापर कोणत्याही उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी पैसे देण्यासाठी केला जाऊ शकतो. ज्यामध्ये ई-कॉमर्स व्यवहार, UPI आयडी स्कॅनिंग, पेमेंट, रिचार्ज आणि बिल पेमेंट यांसारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे. फ्लिपकार्ट ग्रुपचे 50 कोटींहून अधिक रजिस्टर्ड यूजर्स आहेत, तसंच या प्लॅटफॉर्मवर 14 लाखांहून अधिक सेलर्स याठिकाणी आहेत अशी माहिती कंपनीने दिली. फ्लिपकार्ट आमच्या ग्राहकांना अपेक्षित असलेली UPI ची सुविधा आणि किफायतशीरपणा अखंडपणे जोडते. आम्ही ग्राहकांना सोयीस्कर पेमेंटचा पर्याय देऊन ग्राहकांना चांगली सुविधा देण्यास वचनबद्ध आहोत. असं कंपनीने म्हंटल. फ्लिपकार्टच्या या UPI सुविधेमुळे पूर्वीप्रमाणे फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करताना पेमेंटसाठी दुसरं अ‍ॅप उघडण्याची गरज ग्राहकांना भासणार नाही. यामुळे लोकांचा शॉपिंगचा अनुभव आणखी चांगला होणार आहे.

असा करा वापर – Flipkart UPI

Flipkart UPI चा उपयोग करण्यासाठी सर्वात आधी Google Play Store वरून Flipkart अपडेट करा.
अँप ओपन करताच ‘स्कॅन आणि पे’ चा पर्याय निवडा.
त्यानंतर ‘MY UPI ’ वर जा आणि ज्या बँकेत तुमचे खाते आहे ती बँक निवडा.
यानंतर Flipkart तुमच्या बँक डिटेल्स ची पडताळणी एसएमएसद्वारे करेल, आणि तुमचा Flipkart UPI ऍक्टिव्ह होईल.