नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत लिस्ट होण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी अमेरिकेत IPO बाजारात आणणार असून या पब्लिक इश्यूद्वारे 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 73,000 कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. या माध्यमातून कंपनीचे मूल्यांकन 50 अब्ज डॉलर म्हणजेच 3.66 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवायचे आहे. पण अशा बातम्या येत आहेत की, या IPO पूर्वी फ्लिपकार्टने 3 अब्ज डॉलर म्हणजेच 22,000 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची तयारी केली आहे.
फ्लिपकार्टने जपानी इंवेस्टमेंट कंपनी सॉफ्टबँकशी (Softbank) 3 अब्ज डॉलर्सच्या निधी उभारणीसाठी चर्चा करीत आहे. सॉफ्टबँकशिवाय ही कंपनी कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB), अबू धाबी आधारित कंपनी ADQ शीही चर्चा करीत आहे. या व्यतिरिक्त कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदार कतार इंवेस्टमेंट अथॉरिटी आणि GIC सुद्धा या फंड उभारणीत सामील होऊ शकतात. या फंड उभारणीनंतर फ्लिपकार्टचे मूल्यांकन 30 ते 35 अब्ज डॉलरच्या जवळपास असू शकते. या फंड उभारणीत, सॉफ्टबँकला फ्लिपकार्टमध्ये 500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे.
आतापर्यंत सॉफ्टबँकने फ्लिपकार्टमध्ये 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे
साल 2018 पासून फ्लिपकार्टमध्ये सॉफ्टबँकने 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या निधी उभारणीत ADQ 500 मिलियन गुंतवणूकीची चर्चा करीत आहे, तर CPPIB कंपनीत 800 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय GIC आणि कतार इंवेस्टमेंट अथॉरिटी (QIA) 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते.
फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टचा 77.8% हिस्सा आहे
फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टचा 77.8% हिस्सा आहे. चीनी कंपनी टेन्सेंटचा 5% हिस्सा, QIA 1.5%, टायगर ग्लोबलचा 4.5%, कंपनीचा को-फाउंडर बिन्नी बसंलचा 3.3%, ईसॉप पूलचा 5.1% आणि इतर कंपन्यांचा 2.8% हिस्सा आहे. फ्लिपकार्ट 80 हून अधिक प्रकारात 1.5 करोड़ प्रोडक्ट देते. कंपनीचा रजिस्टर्ड कस्टमर बेस 30 कोटी आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा