सह्याद्रीच्या कुशीतल्या ‘या’ फुलाला शरद पवारांचं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार यांचं नाव राजकारणाच्या पटलावर जसं ठळकपणे घेतलं जात तसं आता सह्याद्रीच्या कुशीत आढळणाऱ्या एका फुलावर देखील शरद पवार यांचं नाव कायमच उमटलं जाणार आहे. सह्याद्रीत आढळणाऱ्या एका फुलाला ‘आर्जेंरिया शरदचंद्रजी’ असं नामकरण करण्यात आले आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड या दोन युवा वनस्पती शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावला असून, शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदान याबाबत या नव्या प्रजातीच्या फुलाला हे नाव देण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

गारवेल कुळातील ही वनस्पती असून डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्ष या कुळातील वनस्पती चे संशोधक म्हणून जगविख्यात आहेत. त्यांनी आजपर्यंत पाच नव्या प्रजातींचा शोध लावला असून जगभरात या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘आर्जेंरिया शरदचंद्रजी’ या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या ‘रिडिया’ या अंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकताच प्रकाशित करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळेंनी मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत जर दोन्ही संशोधकांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे असे आदरणीय साहेब म्हणतात. असा आदर व सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचा संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केलं याचा मला नितांत आदर आहे धन्यवाद .’

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment