मोदींच्या मेगा आर्थिक पॅकजमध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत ‘या’८ तरतुदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर केला. या पॅकजमध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सरकारने काय आर्थिक उपायोजना केल्यात त्याची माहिती सीतारमन यांनी दिली.

१)शेतीकरिता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी नाबार्ड ग्रामीण बँकांना अतिरिक्त ३० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

२)मच्छीमार आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळणार आहे.

३)१ मार्च ते ३० एप्रिल या काळात कृषी क्षेत्रासाठी ८६,६०० कोटी रुपयांची ६३ लाख कर्जे मंजूर करण्यात आली.

४)मार्च २०२० मध्ये नाबार्डने कोऑपरेटीव्ह आणि ग्रामीण बँकांना २९,५०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले.

५)ग्रामीण भागात पायाभूत सोयी-सुविधांसाठी ग्रामीण पायाभूत विकास फंडातंर्गत राज्यांना ४,२०० कोटी रुपये देण्यात आले.

६) ३ कोटी छोटया शेतकऱ्यांना ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यांना व्याजामध्ये सवलत देण्यात आली. ही सवलत आता ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

७) २५ लाख किसान क्रेडिट कार्डमधून २५००० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

८) कृषी मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने ६७०० कोटी राज्य सरकारना उपलब्ध केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment