Multibagger Stock : 17 रुपयांवरून थेट 548 रुपयांवर पोहचला ‘हा’ Stock; गुंतवणूकदारांसाठी ठरला Multibagger

Focus Light And Fixtures Limited Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट मधील गुंवणूकीच्या दृष्टीने गेली ३ वर्ष हि जरा कठीणच होती. आधी कोरोना आणि मग रशिया -युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळत असताना एक कंपनी मात्र ह्या परिस्थितीतही तुफान तेजीत आगेकूच होती. जी गेल्या तीन वर्षात अक्षरशः multibagger ठरली आहे. लाईट एमिटिंग डायोड (LED ) लाईट्स आणि फिक्सचर्स बनवणाऱ्या “फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना हा मोठा फायदा मिळवून दिला आहे.

फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंवणूकदारांना फक्त ३ वर्षातच त्यांच्या गुंतवणूकीवर जबरदस्त रिटर्न दिला आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीचा शेअर १७ रुपयांवरून थेट ५४८ रुपयांवर पोहचला आहे ज्यामुळे गुंवणूकदारांचे ३ वर्षातच १ लाख रुपयांचे ३१ लाख रुपये झाले आहेत … म्हणजे २०२० ते २०२३ या आर्थिक वर्षात “फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनीने आपल्या गुंवणूकदारांना जवळपास ३०५० टक्के परतावा दिला आहे. १७ मे २०२२ रोजी आपल्या ५२ आठवड्यातील सर्वात कमी ८०/- ह्या दराची नोंद करणाऱ्या “फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनीच्या शेअरने २ मे २०२३ रोजी ७८५ रुपये हि विक्रमी किंमत गाठली.

रिलेटिव्ह स्ट्रेन्थ इंडेक्स-

टेक्निकल स्तरावर या स्टॉक चा RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेन्थ इंडेक्स पाहिल्यास तो ४३.२ इतका आहे ज्यामुळे हा स्टॉक ‘ओव्हर बॉट’ वा ‘ओव्हर सोल्ड’ क्षेत्रात नसून गुंतवणुकीच्या दृष्टीने त्यात अजूनही उत्तम पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून येते . या शेअर मध्ये बीटाचे प्रमाण ०. ०७ असल्याने गेल्या वर्षभरात यामध्ये खूपच कमी प्रमाणात अस्थिरता दिसून आली आहे . तसेच मुविंग ऍव्हरेजचे विश्लेषण केले असता “फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनीच्या शेअरमध्ये १०० आणि २०० दिवसाच्या मुविंग ऍव्हरेजपेक्षा अधिक तर ५,२० आणि ५० दिवसांच्या मुविंग ऍव्हरेजपेक्षा कमी व्यवहार होत असल्याचे दिसून येते.

१ लाखाचे झाले ३१ लाख-

११ मे २०२० रोजी १७. ४० रुपयांवर रेंगाळणारा “फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनीचा शेअरने ११ मे २०२३ रोजी NSE वर विक्रमी ५८५. ५५ रुपयांची नोंद केली आहे म्हणजेच जर तुम्ही ११ मे २०२० रोजी ह्या शेअर मध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या १ लाख रुपयांचे आजच्या घडीला चक्क ३१ लाख रुपये झाले असते.

“फोकस लाईट अँड फिक्सचर लिमिटेड” कंपनी इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आणि इलेक्ट्रिक वस्तूंचे उद्पादन करण्यात अग्रेसर आहे ज्यात ऑफिस लायटिंग ,होम लायटिंग ,हॉस्पिटॅलिटी लायटिंग तसेच काही infrastructure प्रोजेक्ट्सही समाविष्ट आहे. मार्च २०२३च्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट हा ५३ टक्क्यांनी वाढला असून कपंनीने ५. ३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील या तिमाहीत ३. ५१ कोटी रुपये इतका नफा झाला होता. तसेच गेल्यावर्षी ३५. ०६ कोटी रुपयांवर असलेला सेल १६. ६३ रुपयांनी वाढून ४०. ८९ कोटी रुपयांवर गेला आहे .