हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल काय नवीन ऐकायल मिळेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर तर अजब गोष्टी आपण रोजच ऐकतो. मात्र प्रत्यक्षात काही गोष्टी अश्या काही गोष्टी आहेत. ज्या वाचून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक गाव आहेत. जिथे प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो. एक वेगळं नवल असत. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय हा दोन ते अडीच तास उशिरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. त्यामुळे या गावातील दिवस हा केवळ 6 ते 7 तासाचा असतो.
कोणतं आहे हे गाव?
सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल हे ‘फोफसंडी’ नावाचे गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या या गावास निसर्गाची साथ चांगलीच लाभलेली आहे. या गावात नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य आढळते. त्यामुळे या गावातील लोक अगदी आनंदाने येथे राहतात.
गावात 12 वाड्या आणि 12 आडनावाचे राहतात लोक
गावाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात हे काही उगवेल ते कमवून ही लोक पुणे – ठाणे यासारख्या ठिकाणी आठ महिने रोजदांरीसाठी जातात. या गावाची विशेषता ही अशी की या गावात एकूण बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक येथे राहतात. यामध्ये वळे, पिचड, कोंडार, भगत, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. गावात मुख्यतः भात, नागली, वरई पिके घेतली जातात.
भौतिक गरजांची आहे कमतरता
गावाला निसर्ग प्रसन्न आहे. त्यामुळे येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजांची कमतरता येथे आहे. येथे प्रत्येकाला या सुविधा मिळत नाहीत. पुरेसे पाणी नसल्यामुळे या गावात इतर पिके घेता येत नाहीत. या गावातून मांडवी नदीचा उगम होतो. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. त्यामुळे येथे असलेला फोफसंडीचा धबधबाही खूप लोकप्रिय आहे.
गावाला फोफसंडी नाव का देण्यात आले?
प्रत्येक गावाची जशी एक कथा असते. अकदी तशीच या गावाचीही आहे. या गावास फोफसंडी हे नाव पडले कारण येथे फॉफ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी सुट्टीच्या दिवशी यायचा. या निसर्गरम्य ठिकाणी तो आपला विकेंड साजरा करत असे. तेव्हापासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. त्यानंतर या शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले आहे.