दातांचा पिवळेपणा अन् तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच जण नेहमीच छान दिसण्यासाठी आपल्या शरीराची काळज घेतो . फिट राहण्यासाठी जिम जॉईन करतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पौष्टीक आणि सकस आहार घेतो. चेहऱ्याची,केसांची,डोळ्यांची काळजी घेतो. आपले डोळे हे जसे राग व्यक्त करत असतात तसेच आपले हसणे हे आपल्या मनातील आनंद साजरे करण्याचे प्रतीक आहे जे आपल्या मनातील प्रसन्नतेची समोरच्याला जाणीव करून देतात पण अस्वछ,दुर्गंधीयुक्त आणि कीड लागलेल्या दातांमुळे कधी कधी आपणच इतरांच्या हसण्यास पात्र ठरू शकतो . हे टाळण्यासाठी अन दातांचे सौंदर्य वाढवून ते अधिक खुलवण्यासाठी आपण सहजपणे काही उपाय अंमलात आणू शकतो.

दातांची योग्य ती काळजी न घेतल्याने पिवळेपणा,दातांना कीड लागणे ,पायरिया , हिरड्यांतून रक्त येणे आणि तोंडातून दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात. जेव्हा आपण दातांच्या लहान लहान दुखण्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा अश्या प्रकारच्या समस्या उदभवतात. आजच्या ह्या लेखात आपण आपल्याला उदभवणाऱया दातांच्या समस्येवर कोण कोणते उपाय करता येऊ शकतात हे जाणून घेऊया.

खालील मुद्द्यांवरून आपण कश्याप्रकारे दातांची काळजी घेऊ शकतो हे पाहूया…

दातांची काळजी घेण्याचे काही सोपे उपाय

1) आपला आहार बदला

जर तुम्ही रोज गोड पदार्थ वा दातांना चिकटणारे अन्नपदार्थ खात असाल तर सहजच सूक्ष्म जीवजंतूंना दातांवर हल्ला करण्याचे तुम्ही आमंत्रणच देत आहात आणि सुक्ष्म जंतूंना दिलेले हे आमंत्रण दातांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे जर तुम्ही रोज गोड पदार्थ खात असाल तर त्यांपासून जरा दूरच राहणे तुमच्या हिताचे ठरेल अन्यथा गोड पदार्थांनी दात किडू लागतील.

2) दिवसातून 2 वेळा दात घासणे गरजेचे आहे

शाळेत असल्यापासून चांगल्या सवयी ह्या उपक्रमा अंतर्गत आपल्याला दिवसातून दोन वेळा दात घासण्यास सांगितले जायचे. जर तुम्हाला निरोगी दात हवे असतील तर तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी ब्रशने दात स्वच्छ केले पाहिजेत. जे लोकं दात न घासताच रात्री झोपी जातात त्यांना दातांशी निगडित समस्यांचा सामना करावा लागतो.

3) गुटखा आणि तंबाखू चघळू नका

गुटखा आणि तंबाखू चघळून इतरत्र थुंकणे हे जितके आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे तितकेच ते दातांसाठी देखील हानिकारक आहेत. ज्यामुळे दात, हिरड्या आणि जिभेवर गंभीर स्वरूपाचे आजार ओढवू शकतात. गुटख्याच्या सेवनाने दातांवर कायमस्वरूपी डाग तयार होतात जे जाणे केवळ अशक्य आहे . त्यासाठी गुटखा ,तंबाखू ह्यांसारख्या आरोग्यास हानी पोहचवणाऱ्या विषयुक्त खाद्यपदार्थांना स्पर्श देखील करू नका. .

4) वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांकडून दात तपासून घ्या

तुम्ही दातांची कितीही काळजी घेत असाल तरीही महिन्यातून एकदा वा शक्य झाल्यास दोनदा तरी दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमचे दांत तपासून घ्या. जेणे करून तुमच्या दातांमध्ये उत्पन्न होणाऱ्या त्रासाबद्दल तुम्ही जाणून घेऊन वेळीच त्यावर योग्य ती उपाय योजना करू शकाल .