Foods For Healthy Heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात करा ‘या’ 4 पदार्थांचा समावेश, मिळतील अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Foods For Healthy Heart | आजकाल हृदय विकाराच्या झटक्याचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराच्या धोक्याची काळजी असते. जर तुम्हाला तुमचे हृदय चांगले ठेवायचे असेल, तर त्यासोबत तुम्ही चांगले अन्न देखील ग्रहण केले पाहिजे. त्यामुळे तुमचा हृदयविकाराचा धोका तर कमीच होतो. परंतु तुमच्या शरीरात देखील खूप लक्षणीय बदल होतात. जर तुम्हाला तुमचे उदय चांगले ठेवायचे असेल तर अशी काही पदार्थ खाल्ले पाहिजे (Foods For Healthy Heart)ज्यामुळे तुमच्या आरोग्य निरोगी राहील.

आपण बऱ्याच वेळा बाहेरचे तेलकट तसेच उघड्यावरचे अन्न खातो. त्यामुळे आपल्या बॉडीतील कोलेस्ट्रॉल वाढते आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्यामुळे आता आपण असे काही पदार्थ जाणून घेणार आहोत जे तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवतील.

बदाम | Foods For Healthy Heart

बदाम हे एक ड्रायफ्रूट आहे. परंतु आपल्या शरीरातील अनेक पोषक तत्व भरून काढण्यासाठी बदामाचा वापर होतो. बदामाचे सेवन केल्याने आपल्या हृदयाच्या आरोग्य देखील चांगले राहते. यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात. त्याचप्रमाणे फायबर देखील बदाममध्ये असते. त्यामुळे हृदय विकायला टाळण्यासाठी बदाम अत्यंत गरजेचे आहे.

हिरव्या पालेभाज्या

केवळ हृदयासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये पालक, मेथी यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या शरीरातील जीवनसत्वे, खनिज आणि अँटिऑक्सिडंटची कमतरता टाळू शकते. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्यासाठी देखील हिरव्या पालेभाज्या खाणे खूप गरजेचे आहे.

ग्रीन टी

आपण रोज सकाळी उठल्याने चहा किंवा दूध घेतो. परंतु त्याऐवजी जर तुम्ही उपाशीपोटी ग्रीन टी घेतला तर त्याचा फायदा होतो. तुम्हाला खूप फायदा होतो आणि हृदय विकाराच्या झटक्याचा धोका देखील कमी होतो. त्याचप्रमाणे तुमच्या रक्तवाहिनदेखील निरोगी राहतात. (Foods For Healthy Heart)

अक्रोड

आपले वय वाढत जाते त्याचप्रमाणे हृदयाच्या धमन्यामध्येही धोका निर्माण होतो.यासाठी अक्रोड हे अत्यंत चांगले फळ आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. आणि आपल्या शरीराला हृदयाला त्याचप्रमाणे मेंदूला देखील अक्रोडचा खूप मोठा फायदा होतो.