मुंबई प्रतिनिधी | शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून दोन्ही पक्षांतील नेत्यांमधे मागील काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. ‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरें यांनी भाजप ला टोला लगावला. अंबरनाथ येथील शूटिंग रेंजच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. या सोहळ्याला आदित्य ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमा अगोदर शिवसेनेतर्फे ‘आता निशाणा साधायचाच’ अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यातून अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता, ‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामे आणि त्यांना उपयुक्त सोई-सुविधा पुरविणे हेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्टल हाती निशाणेबाजी करण्याचा चोख प्रयत्न केला.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना
मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव