औरंगाबाद | प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण 318 नवे रुग्ण आढळले. यात शहरातली 99, तर ग्रामीण भागातील 219 रुग्णांचा सामावेश आहे.
सुमारे साडेतीन महिन्यानंतर म्हणजेच 16 फेब्रुवारी नंतर औरंगाबाद शहरातील नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या आता आली आहे.16 फेब्रुवारीला शहरात 96 रुग्ण होते. मात्र 17 फेब्रुवारीला ही संख्या 119 वर गेली आणि तेव्हापासून रुग्ण वाढत गेले.
दरम्यान, बुधवारी 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी चार बाहेरच्या जिल्हयातील आहेत.तर दिवसभरात 442 जणांना ( मनपा 200,ग्रामीण 242) सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,33,457 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 4,871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी घाटीत 16,जिल्हा रुग्णालयात एक, तर खाजगी रुग्णालयात चौघांचा मृत्यू झाला.