नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख ,
शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.नाशिक – लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात बिबट्या आढळला.बिबट्याने झाडाच्या शेंड्यावर आश्रय घेतला. त्यामुळे वन विभागा्च्या कर्मचाऱ्यांना बिबट्या खाली उतरेपर्यंत वाट पाहावी लागली. काही तासांनी खाली उतरलेला बिबट्या जवळच्या पाणवठ्यावर गेला असताना त्याला ट्रँम्यूलायझिंग गनच्या साह्याने बेशुद्ध करण्यात आले.
शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.