कोरोना रोखण्यासाठी केरळने केली बूस्टर डोसची मागणी, म्हणाले-“Covishield च्या दोन डोसमधील अंतरही कमी करावे”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुवनंतपुरम । केरळने केंद्राकडे मागणी केली आहे की, इतर कोणत्याही आजाराने बळी पडलेल्यांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा. केरळ सरकारने केंद्राला Covishield च्या दुसऱ्या डोसमधील अंतरही कमी करण्यास सांगितले आहे. तसेच अँटी-कोविड-19 लसीकरणाशी संबंधित प्रमुख समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, “मी स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून मुलांच्या लसीकरणाबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच Covishield च्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी कमी करण्याचा विचार करण्याची विनंती केली.”

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जॉर्ज म्हणाले – “आता 84 दिवस झाले आहेत मात्र आम्ही केंद्र सरकारला हा कालावधी कमी करण्यास सांगितले आहे. केरळ हे असे राज्य आहे की, जिथे मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय आहेत. इथली बरीच लोकं परदेशात काम करतात आणि त्यांनी इथे येऊन लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस मिळवण्यासाठी 84 दिवस राहणे त्यांच्यासाठी अवघड होईल. म्हणूनच आम्ही हे अंतर कमी करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार आता त्यावर विचार करेल, असे पत्र मला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून मिळाले आहे.”

बूस्टर डोसबाबत लिहिलेले पत्र
विशेषत: राज्यातील 30% लोकसंख्येतील असंसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीच्या बूस्टर डोसच्या गरजेबाबत जॉर्ज म्हणाले,”मी यापूर्वीच केंद्रीय (आरोग्य) मंत्र्यांना पत्र लिहिले आहे की, त्यांनीही ते घ्यावे. बूस्टर डोसवर एक झटपट नजर टाका आणि निर्णय घ्या. केंद्र सरकार यावर विचार करेल असे मला वाटते. आमच्या प्रधान सचिवांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांकडे हा मुद्दा मांडला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.”

शुक्रवारी केरळमध्ये कोविड-19 चे 6,674 नवीन रुग्ण आढळल्याने, राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 50,48,756 झाली आहे तर आणखी 59 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 35,511 झाली आहे. केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 7,022 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत, त्यामुळे राज्यात या प्राणघातक विषाणूच्या संसर्गावर मात करणाऱ्यांची संख्या 49,43,813 ने वाढली आहे. या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की, “राज्यातील कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 68,805 वर आली आहे त्यापैकी केवळ 6.7 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.”

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 14 जिल्ह्यांपैकी एर्नाकुलममध्ये सर्वाधिक 1,088 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर तिरुवनंतपुरममध्ये 967, तर त्रिशूरमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची 727 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोविड-19 साठी 65,147 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यात एकूण 2,18,871 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यापैकी 5,578 लोकांना विविध रुग्णालयांमध्ये आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment