ट्रक टर्मिनलसाठी महापालिकेच्या ताब्यातील जागेचा वापर करावा – पालकमंत्री सतेज पाटील

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
तावडे हॉटेल येथील महापालिकेच्या ताब्यात असणारी जागा ट्रक टर्मिनलसाठी वापरात आणावी, आशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.  तावडे हॉटेल येथील जागेची, बस टर्मिनलसाठी शिरोली जकात येथील जागेची तसेच व व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्डा येथील पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी तावडे हॉटेल येथील ट्रक टर्मिनलची पाहणी केली. यावेळी २३ एकर पैकी तीन ते साडेतीन एकर महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या साडेतीन एकर जागेची साफ सफाई जेबीसीच्या सहाय्याने करावी. या जागेत असणारे पीक निघाल्यानंतर तीची साफ सफाई करुन जागा वापरात घ्यावी. या जागेवर किमान १०० ट्रक थांबू शकतील. त्यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here