हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागात रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत तब्बल 127 जागा भरल्या जाणार आहेत. लेखापाल (गट क) पदांसाठी ही भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
संस्था – वन विभाग
पद संख्या – 127 पदे
भरले जाणारे पद – लेखापाल (गट क)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.
अर्ज फी –
अमागास प्रवर्ग – रु. 1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सदर उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2. अर्ज स्विकारणाच्या अंतिम तारखेस सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
लेखापाल रु. 29,000 – 92,300/- दरमहा
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
परीक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल.
उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply