सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा-लोणंद रस्त्यावर देऊरनजीक वन विभागाने विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
वनविभागाने दिलेली माहिती अशी, सातारा-लोणंद रस्त्यावर ट्रक्टरमधून विनापरवाना लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांना मिळाली. त्यानुसार गस्त घालत असताना संबंधित ट्रक्टर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवून कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधित चालकाला लाकडाचा परवाना दाखवता आला नाही. त्यामुळे वाहन व लाकूड असा 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वाहनांमध्ये करंज, लिंब, चिंच, आंबा, अलगड या जातीचे लाकूड आढळले.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वैभव घार्गे, वनपाल एस. एस. निकम, वनरक्षक बी. बी. मराडे, एस. व्ही. शेलार, एस. एस. मुंडे, वनमजूर किरण मदने यांनी ही कारवाई केली.