गोवा बनावट मद्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा घातला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तपासणी केली. या तपासणीत  6 लाख 7 हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे 110 बॉक्स तसेच 4 लाख 57 हजार किंमतीचे वाहन आणि मोबाईल असा एकूण 10 लाख 64 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिलारी घाट मार्गावरुन काही इसम बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैधरित्या चोरटी वाहतूक करुन मद्याची देवाण घेवाण करणार आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली. या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर येथील वीज निर्मिती कार्यालयासमोरील शेतवडी इथं काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली. या वाहनाची तपासणी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी गेले असता त्यांना छाप्याची चाहुल लागली. त्यामळे संशयतांनी वाहन चालू करुन भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळील वाहन बोलेरो समोर उभे करुन तपासणी केली असता बोलेरो मध्ये प्रवासी बसण्याच्या रचनेत बदल करुन गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे गोल्डन एस. ब्ल्यु. व्हीस्की ब्रँडच्या 750 मिली व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले एकूण 110 बॉक्स इतका मद्यसाठा मिळून आला. पोलिसांनी चालक प्रितेश उल्हास पांगम याला ताब्यात घेतले आहे. अंधाराचा फायदा घेवून सुनील राजाराम घोरपडे याच्यासह अन्य मात्र पसार झाले. घोरपडे हा सराईत गुन्हेगार असून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment