हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकेकाळी वर्णभेदामुळे काही लोकांना त्रास सहन करावा लागतो त्या वर्णभेदाविरोधात आयुष्यभर लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे आज निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
नोबल शांती पुरस्कार विजेते डेसमंड टूटू यांना 1990 च्या दशकात प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डेसमंड टूटू यांच्या निधनावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांनी शोक व्यक्त केला आहे.
आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टूटू यांनी वर्णभेदा विरोधात लढा देऊन आम्हाला एक नवीन दक्षिण आफ्रिका दिला. ते मानवाधिकाराविरोधात लढणारे यूनिव्हर्सल चॅम्पियन होते, अशी शोक भावना रामफोसा यांनी व्यक्त केली आहे. 1986 मध्ये केपटाऊनमध्ये ते पहिले आर्चबिशप बनले.
आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारशी चर्चा झाल्यानंतर 1990 मध्ये नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर वर्णभेदाविरोधातील कायदा संपुष्टात आणला गेला. 1994 मध्ये विजयी झाल्यानंतर राष्ट्रपती मंडेला यांनी मोठा निर्णय घेतला. 2007 मध्ये भारत सरकारने डेसमंड यांना गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवले होते.