मुस्लिम आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांची राष्ट्रवादीवर टीका; RSS शी संबंध असल्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे. नवाब मलिक यांची भूमिका ही संघासारखी आहे, त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहायचं की नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू नये अशी संघाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संघाचे संबंध हे जगजाहीर आहेत. त्यामुळे नवाब मलिक हे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत ते वस्तुस्थितीला धरून नाही. नवाब मलिक यांची ही भूमिका संघासारखी आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून देखील सरकार वर टीका केली. राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली ओबीसी समाजबद्दलची माहिती व आकडे दिले नाहीत तर येत्या काही वर्षांत ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणही जाईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.