सातारा | ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर यांचे आज पहाटे (वय- 81) निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरेश वीर हे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी चेअरमन होते. किसनवीरांचा विधायक वारसा ते चालवत होते. कै आ. विलासकाका पाटील उंडाळकर, कै. आ. लक्ष्मणतात्या पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर आज दुपारी वाई येथील कवठे या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.
साताऱ्याच्या सहकार क्षेत्रात सुरेश वीर यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांच्या निधानाने सहकार क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. किसन वीर सहकारी साखर कारखाना तसंच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी आपल्या कामाने वेगळी छाप उमटवली. उल्लेखनिय काम करताना बँक सतत अग्रसर ठेवली. आदर्शवत काम करताना दोन्ही संस्थाचा नावलौकिक कसा वाढवता येईल, हे त्यांनी पाहिलं.