माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, आधी शपथ तर घेऊ द्या! मग सांगतो..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतीपुरस्कृत राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्यावरुन देशात सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियातून तर न्या. गोगोई यांच्या यापूर्वीच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, आज राज्यसभेची उमेदवारी स्वीकरण्याबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना गोगोई यांनी मोठं विधान केलं आहे.

राज्यसभेचे सदस्यत्व घेण्याच्या प्रश्नावर माजी सरन्यायाधीशांनी शपथ घेतल्यावर याबाबत खुलासा करणार असल्याचं सांगितले. ते म्हणाले, “उद्या (बुधवारी) बहुधा मी दिल्लीला जाईन… मला आधी शपथ घेऊ द्या, मग मी राज्यसभेचे सदस्यत्व का स्वीकारले याविषयी सविस्तरपणे माध्यमांना सांगेन”

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अयोध्या प्रकरण आणि इतर काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये निकाल दिला. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील गोगोई यांचे सहकारी न्या. मदन लोकूर यांनी गोगोई यांना राष्ट्रपतीपुरस्कृत राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यावरुन तिखट शब्दांत टिपण्णी केली आहे.

न्या. लोकूर यांनी म्हटले की, “माजी सरन्यायाधीश गोगोई यांना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. त्यातच त्यांना उमेदवारी मिळणं हे आश्चर्यचकीत करणारं नाही. मात्र, हे अगदीच लवकर झालं हे आश्चर्यकारक आहे. ही बाब न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.” आता शेवटचा स्तंभ देखील कोसळला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment