Friday, January 27, 2023

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का?? ; फडणवीसानी दिलं ‘हे’ उत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. घटस्थापनेचा मुहूर्त चुकला असला तरी आता तर 22 ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे.

देवेंद्र फडणवीस हे सध्या उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले असताना पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे का, असे विचारले असता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही’ असं म्हणत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचे टाळले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे.  खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’