हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीरने अनेक समाजकार्य केली. त्याने आपला खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर स्थलांतरीत मजूरांनाही त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भरभरून मदत केली. आता गंभीर यांनी जनतेच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी ‘जन रसोई’ सुरू केली आहे. गुरुवारी त्यांनी गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केले.
कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवे आणि तो प्रत्येकाचा हक्कच असल्याचे मला वाटते. दोन वेळचे जेवणही बेघर आणि निराधार लोकांना मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटत असल्याचे गंभीर म्हणाला.
वादे नहीं, इरादे लाया हूँ…
ना मन्दिर से आरती, ना मस्जिद से आज़ान लाया हूँ…
ना राम का वास्ता, ना मोहम्मद की दुआ लाया हूँ…
इंसान हूँ, इंसान के लिए दो रोटी लाया हूँ….
वादे नहीं, इरादे लाया हूँ… #JanRasoi #FoodForAll pic.twitter.com/pFDm0MLWaR
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 24, 2020
त्यामुळे जन रसोई कँटिन पूर्व दिल्लीतील दहा विधानसभा मतदारसंघात सुरू करण्याचा विचार गंभीर करत आहे. गांधी नगरमध्ये देशातील सर्वात मोठे होलसेल गार्मेंट मार्केट आहे आणि तेथे जन रसोई कँटिन उघडण्यात आली आहे. येथे १ रुपयांत जेवण दिले जाणार असल्याचे गंभीरच्या कार्यालयाने सांगितलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कँटिनची क्षमता १०० माणसांची आहे, परंतु कोरोना नियमांमुळे एका वेळी ५० लोकांनाच येथे येता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे. स्वतःच्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा खर्च गौतम गंभीर उचलणार असून तो त्यासाठी सरकारची मदत घेणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’