हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे
हरभजन म्हणाला, मी ३१ वर्षांचा होतो. तेव्हा मी कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट मिळवल्या होत्या. जर मी ३१व्या वयात ४०० विकेट घेत असेन तर पुढील ८-९ महिन्यांत मी कमीत कमी १०० पेक्षा जास्त विकेट घेऊ शकत होतो. मात्र यानंतर मला जास्त सामन्यांमध्ये खेळवले नाही. विशेष म्हणजे मला सिलेक्टही केले जात नव्हते.
तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला मला संघातून वगळण्याचे कारण विचारले, परंतु माझ्या प्रश्नाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जाब विचारण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच मी पुन्हा कारणे विचारणे बंद केले. खरेतर धोनीकडून जाणून घ्यायचे होते की मला का वगळण्यात आले, पण मला कोणतेही उत्तर शेवटपर्यंत मिळाले नाही, अशी खंत त्याने बोलून दाखवली.