हरभजन आणि कुंबळेला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर …; मोटेरा पिच वरून भारतीय खेळाडूनेच सुनावलं खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 10 विकेट राखून विजय मिळवला. अश्विन आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकीपटू जोडीपुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. आणि भारताला हा विजय अतिशय सोप्पा झाला.

पण टीम इंडियाच्या या विजयानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दोनच दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट पडल्या. यानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंनी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले. फक्त इंग्लिश खेळाडूच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या खेळपट्टीवर टीका केली आहे.

फक्त दोन दिवसातच मॅच संपली. हे टेस्ट क्रिकेट आहे का नाही ते माहिती नाही. जर अनिल कुंबळे आणि हरभजनला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या, तर त्यांच्या एक हजार आणि 800 विकेट असत्या. विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. अक्षर पटेलची शानदार बॉलिंग. अश्विन आणि इशांत शर्मालाही शुभेच्छा,’ असं ट्विट युवराज सिंगने केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’