हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश येथे मृत घोषित करण्यात आलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल (Mahesh Baghel) पुन्हा जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश बघेल यांना प्रकृती खालवल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांच्या पार्थिवाला घरी आणले गेले. मात्र यावेळी त्यांच्या शरीराची हालचाल जाणवल्यामुळे कुटुंबाचा गोंधळ उडाला. परंतु यातूनच महेश बघेल जिवंत असल्याचे उघडकीस आले. या घडलेल्या प्रकारामुळे बघेल कुटुंबाने डॉक्टरांवर संताप व्यक्त केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी महेश बघेल यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान असं डॉक्टरांनी बघेल यांना मृत घोषित केले. यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे महेश बघेल यांच्या पार्थिवाला सराय ख्वाजा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी सर्व नातेवाईक शोक करत होते. तेवढ्यात महेश बघेल यांनी डोळे उघडले. तसेच हालचाल करण्यास सुरुवात केली.
महेश बघेल हालचाल करत असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. यानंतर त्यांना त्वरीत न्यू आग्रा येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर महेश बघेल जिवंत असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली. या माहितीमुळे बघेल कुटुंबाला देखील दिलासा मिळाला. आता महेश बघेल यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर एका जिवंत माणसाला डॉक्टरांनी मृत घोषित कसे केले हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
महेश बघेल यांच्या प्रकृती विषयी माहिती देताना लहान भाऊ लखन सिंह बघेल यांनी सांगितले आहे की, सध्या माझ्या मोठ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा रक्तदाब 114/70 आहे. उपचाराचा त्यांच्यावर सकारात्मक फायदा होऊन ते लवकरच पूर्णपणे बरे होतील. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे आम्हाला धक्का बसला आहे. त्यामुळे आम्ही हा देवाचा चमत्कारच मानत आहोत.
दरम्यान, महेश बघेल यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती. महेश बघेल हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. परंतु त्यांचे उत्तर प्रदेश मध्ये चांगले वजन आहे. महेश बघेल यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांचे अंतिमदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. मात्र याचवेळी ते जिवंत असल्याचे उघडकीस आले. यापूर्वी देखील अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये मृत व्यक्ती परत काही वेळानंतर जिवंत झाला आहे.