विराट पेक्षा रोहितच सर्वोत्तम कर्णधार ; गौतम गंभीरचं परखड मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | IPL 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. मुंबईने पाचव्यांदा आयपीएल वर आपलं नाव कोरले. मुंबईच्या या विजयानंतर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर रोहित शर्मा वर फिदा झाला असून त्याने रोहित च्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. “जर आता भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलं नाही तर हे भारताचं दुर्देव असेल,” असं मत गंभीर यानं व्यक्त केलं. रोहित शर्माला आता कर्णधार करण्याची वेळ आली असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं

जर कोणताही खेळाडू पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? एक कर्णधार तेवढाच चांगला असतो जेवढा त्याचा संघ असतो यात कोणतंही दुमत नाही. परंतु एका कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं कोणतं प्रमाण असतं? कोणत्याही कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं प्रमाण एकच हवं,” असं गंभीर म्हणाला. “जर आज आपण धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणतो जे तो नक्कीच आहे. त्यानं आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक स्पर्धा आणि दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. याच आधारावर आपण त्याला यशस्वी कर्णधार म्हणतो. रोहित शर्मानंही पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. पुढे जाऊन त्याला जर भारतीय संघाचा कर्णधारपद किंवा टी-२० संघाचं कर्णधारपद मिळालं नाही तर ही निंदनीय बाब ठरेल. यापेक्षा रोहित आणखी जास्त काय करू शकतो?,” असंही तो बोलतान म्हणाला. क्रिकइन्फोसोबत साधलेल्या संवादादरम्यान त्यानं यावर भाष्य केलं.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कर्णधार म्हणून किती फरक आहे हे रोहित शर्मानं सिद्ध केलं आहे. एक खेळाडू पाच वेळा विजेतेपद मिळवत आहे आणि दुसरा आतापर्यंत एकदाही जिंकला नाही,” असंही गंभीर म्हणाला. विराट कोहली हा अयोग्य कर्णधार आहे असं बिलकुल म्हणणं नाही. परंतु विराट आणि रोहित यांना एकच मंच मिळाला आहे आणि त्यात रोहितनं स्वत:ला सिद्ध केल्याचंही गंभीरनं सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment