मंदिरं बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरण; सदाभाऊ खोत यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारसाठी दारूच्या बाटल्या सापडणे हि गोष्ट काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे,” अशी टीका खोत यांनी यावेळी केली.

सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांच्या घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात ? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या ? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

अगोदरच महाविकास आघाडी सरकार मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून अडचणीत सापडले आहे. यावरून भाजपकडून जोरदार हल्लाबोल्ही केला जात आहे. आशात आज मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका होऊ लागली आहे.

Leave a Comment