माजी आ.परिचारक निवडणूक लढणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिलेआहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार पडली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी  सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी. असा सर्वानुमते ठराव नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिला.

सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचे सलग 20 वर्षे प्रतिनिधित्व केल आहे . तर काॅग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या काळात १० वर्षे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवल. राजकारणात संत म्हणून त्यांच्याकड जस पाहिल जात तस ते सहकारातील डाॅक्टर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. परिचारक यांनी सोलापूर जिल्हयातील भीम, पांडूरंग आणि दामाजी असे डबघाईला आलेले साखर कारखाने सुस्थितीत आणला.

आज ही अनेक साखर कारखानदार परिचारकांचा सल्ला घेतात. 2009 च्या विधानसभा निवडणूकीतून माघार घेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपुरातून संधी दिली होती. त्यावेळी आमदार भारत भालके यांनी मोहिते पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणूकीत आमदार भारत भालके यांनी पुन्हा आमदार प्रशांत परिचारकांचा पराभव करत पंढरपुरातील राजकारणाचा पट मारला होता.

परिचारकांच सुमारे 80 वर्षे वय आहे तरी त्यांचा कामाचा आवाका आणि जनसंपर्क पहाता त्यांना निवडणूकीत सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आज परिचारक समर्थकांची बैठक झाली ती मध्ये परिचारकांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली. कार्यकर्त्यांच्या मागणी नंतर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत सुधाकर परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Leave a Comment