मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने आमदारांची पक्षातून हकालपट्टी करायला सुरुवात केली आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirav adhalrao patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. आढळराव पाटील (shivajirav adhalrao patil) यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षापासून दूर करण्याचे सत्र सुरु केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@ShivajiAdhalrao) July 1, 2022
शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirav adhalrao patil) यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. यामुळे त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली.
कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?
शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirav adhalrao patil) शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत. 2004 साली ते पहिल्यांदा निवडून आले होते. 2009 आणि 2014 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली होती. सलग 15 वर्ष ते खासदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. शिवाजीराव आढळराव पाटील हे पुणे जिल्ह्यातल्या शिरुर मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.
हे पण वाचा :
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ???
Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स
Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!
साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार
गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या