हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण अखेर शेवटी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
किशन रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या कालावधीत राजस्थानकडून खेळताना ५९ सामन्यांत २७१७ धावा केल्या. १९९८ मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रीय निवड समितीमध्ये मध्य विभागाकडून स्थान मिळवले होते. किशन रुंगठा यांचे दिवंगत बंधू पुरुषोत्तम यांनी ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्षपद भूषवले होते.
पुरुषोत्तम यांचा मुलगा किशोर यांनी देखील बीसीसीआय’चे कोषाध्यक्षपद भूषवले होते. सुमारे ५ दशके रुंगठा कुटुंबीयांनी राजस्थान क्रिकेट प्रशासनावर राज्य गाजवले.२००५ मधील निवडणुकीत ललित मोदी यांनी रुंगठा यांना निवडणुकीत पराभूत करून राजस्थानच्या क्रिकेट सत्तेवर ताबा मिळवला होता.