आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर आक्रमण करू ; शोएब अख्तर पुन्हा बरळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान नागरिकांचा भारत द्वेष काही नवा नाही. त्यातच भर म्हणून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर पुढे बघू असे विधान केलं आहे. समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. शोएबचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

समा टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत शोएब ‘गजवा-ए-हिंद’बद्दल बोलताना दिसत आहे. ‘गजवा-ए-हिंद’चा अर्थ ‘भारताविरोधात पवित्र युद्ध’ असा होतो. ‘आमच्या पवित्र पुस्तकात ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख आहे. नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे,’ असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे.

नंतर याबद्दल वाचन करावं असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं अख्तरला विचारला होता. त्यावर शोएब ‘हो, म्हणाला त्यानंतर तिथून शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर फत्ते करून पुढे मार्गक्रमण करू,’ असं उत्तर शोएबने मुलाखतीत  दिलं. शोएबचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी शोएबच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’