किरीट सोमय्या मूर्ख व्यक्ती, त्यांची लायकी शिवसेननं दाखवून दिली आहे; माजी आमदाराची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाविषयी आणि ‘मातोश्री’विषयी काहीही बोलू नये, लायकीत राहावे असे म्हणत मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ” असं आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलं. ते कोल्हापुरात बोलत होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, किरीट सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहेत. त्यांना त्यांची लायकी शिवसेननं दाखवून दिली आहे. केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल,अशा शब्दात क्षीरसादर यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, केंद्र सरकारकडून संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ.” असे म्हणत त्यांना थेट आव्हानही दिलं आहे.

काय आहे शिवसेना- सोमय्या वाद

किरीट सोमय्या नेहमीच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असतात. भाजप- शिवसेना युती असताना देखील सेना विरुद्ध सोमय्या वाद सुरुच होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमय्यांनी ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केले होते. त्याची परिणीती म्हणून शिवसेनेने सोमय्यांचं तिकीट कापण्यासाठी भाजपला मजबूर केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा टार्गेट ‘मातोश्री’ केलं आहे.