दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून मोफत आरोग्य तपासणी;दत्त जयंती निमित्त अनोखा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या खिंडी व्हरवडे गावात दत्त जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अथायु मल्टी-स्पेशल हॉस्पिटल, कोल्हापूर व न्यू इंग्लिश स्कुल एस. एस. सी बॅच खिंडी व्हरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच २०००-२००१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

कोल्हापूर शहरापासून तस हे गाव लांब आहे. त्यामुळे तेथील आणि आसपासच्या गावातील रुग्णांना वेळेवर योग्य तपासणी होत नाही. एखाद्या रोगाविषयी सल्ला घेण्यासाठी पंन्नास किलोमीटर जावं लागतं. त्यामुळे काहीजण याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा वाईट परिणाम पण नंतर कधीकाळ सोसावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन खिंडी व्हरवडे गावातील २०००-२००१ च्या इयत्ता दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गावासाठी सर्व आजाराच्या उपचारासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराच वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी आणि सल्ला दिला जातो. शिबिरानंतर वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. तसेच आवश्यकतेनुसार मोफत ई. सी.जी आणि शुगरची तपासणी केली जाते.

पोटदुखी, मुतखडा, चालताना धाप लागणे, हृदयरोग, छातीत धडधड होणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच आणि या शिबिराच नियोजन करणारे अमित पारखे, प्रकाश पाटील, विठ्ठल शेठके,दिगंबर सावंत,अमृत शेटके,मनोज पाटील,राहुल शटके, हे उपस्थित होते.