कराड | रयत शिक्षण संस्थेची स्थापना ज्या गावात झाली त्या कराड तालुक्यातील काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून या शाळेतून शिकून मोठे झालेल्या, मोठ्या पदावर राहून कंपनी मध्ये काम करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांकडून कडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे परदेशात नोकरीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी मदत केली जात आहे. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंड मध्ये स्थायिक असलेल्या विशाखा प्रविण पाटेकर – यादव.
कै. रामचंद्र पांडुरंग यादव -(राम मास्तर व काले गावचे माजी सरपंच) यांची नात व मा.श्री.नारायण रामचंद्र यादव (भाऊ) यांची सुकन्या व विद्यालयाची २०००-२००१ बॅच ची माजी विद्यार्थिनी व लंडन स्थित आरक्याडिस कंपनी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत असणाऱ्या मा.सौ. विशाखा प्रविण पाटेकर – यादव यांनी लंडन मध्ये राहून ही आपल्या शाळा माऊलीचे ऋण व्यक्त करण्यासाठी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी १ लाख १ रुपये/- देणगी दिली. त्यांच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
महात्मा गांधी विद्यालय शाळेच्या नूतन इमारतीसाठी एकूण खर्च 2 कोटी 70 लाख रुपये लागणार असून आत्तापर्यंत राष्ट्रवादी वेलफेअर फंड तर्फे 80 लाख रुपये तर रयत शिक्षण संस्थेकडून 20 लाख रुपये जमा झाले आहेत. आजी- माजी विद्यार्थ्यांनी देखील मदतीचा हात दिला आहे. आजी- माजी विद्यार्थ्यांकडून 20 लाख रुपये जमा करण्याचा शब्द कालेकरांनी खासदार शरद पवार यांना दिला होता तो ही कालेकरांनी पूर्ण केला आहे. असे असल तरी अद्याप अजून देणगी मिळणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर समस्त रयत कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन माजी विद्यार्थी सेवा संघ परिवाराकडून करण्यात येत आहे