Saturday, March 25, 2023

मोठी दुर्घटना ! पुलाचा अंदाज न आल्याने सोलापुरात फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली

- Advertisement -

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर -कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीचा जबरदस्त अपघात (accident) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये हि अपघातग्रस्त (accident) गाडी 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. हि गाडी कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी फॉर्च्यूनर गाडी आष्टी रोपळे या ठिकाणी आली असता अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या भीषण दुर्घटनेत (accident) दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

काय घडले नेमके?
ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी एसआयआयएल कंपनीने रस्त्याचे काम केले असून पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघात घडू शकतात. या याठिकाणी अजून काम बाकी आहे असा साधा सूचनाफलकदेखील लावण्यात आला नाही. त्यामुळे हे अपघात (accident) घडत असतात.

- Advertisement -

यामुळे लोकांनी संबंधित रस्ते विकासक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने चारचाकीच्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हि कार पुलावरुन थेट 50 फूट खाली कोसळल्याने (accident) दोन महिला या घटनेत गंभीर जखमी झाल्या. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..