सातारा | पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला 6 लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतला. इनोव्हा कारमधून निघालेल्या दोघांसह गाडीही वाढे फाटा येथे जप्त केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अर्जुन कुमार चव्हाण (वय- 21) व विशाल अजित हुल्ले (वय- 22, दोघे रा. रूई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटखा एका गाडीतून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक मदन फाळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या पथकाने वाढे फाटा येथे एका मोटारीची तपासणी केली. त्यामध्ये 6 लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी तो गुटखा व 10 लाख रुपये किमतीची मोटार 16 लाख 68 हजार 800 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. अन्न सुरक्षा अधिकारी, हवालदार यांनी हा ऐवज जप्त केला.
याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवकर, उपनिरीक्षक मदन फाळके, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार अतिष घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, अजय जाधव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, हे या कारवाईत सहभागी होते.