कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विरोधकांनी कृष्णा ट्रस्ट खाजगी मालकीचा केला आहे. तसा कृष्णा साखर कारखान्यांचे होणारे खाजगीकरण होऊ नये यासाठी संस्थापक पॅनेलला साथ द्या, असे आवाहन यशवंतराव माहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले. कराड तालुक्यातील विंग येथे संस्थापक पॅनेलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
कृष्णेच्या पंचवार्षिक निवडणुकिनिमीत्त संस्थापक पॅनेलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ येथील जागृत देवस्थान श्री. मारूती रायाच्या साक्षीने येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकित तुम्ही संस्थापक पॅनेलवर विश्वास दाखवला. प्रेम दाखवल, अशिर्वाद देताना त्याचेच फलीत 2010 च्या निवडणुकित पॅनेलला प्रचंड मतानी निवडून दिले. त्या काळात आम्ही सभासदाचे हीत पाहिले. सभासदांना उच्चांकी दर दिला. तोच विश्वास अणि प्रेम या निवडणुकित तुम्ही द्या, अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो.
अविनाश मोहिते पुढे म्हणाले, प्रत्येक गटावर सभासदाना मोफत साखर देण्याचा आमचा मानस आहे. कृष्णेच्या कामगारांना कमीत कमी साडेबारा टक्क्याच्या पुढे बोनस दिला जाईल. गेटकेन पुर्णपणे थांबवून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासभाच्या ऊसाचे गाळप आदी केले जाईल. एफआरपी पेक्षा जास्त रक्कम सभासदाच्या खात्यावर जमा केली जाईल, असी ग्वाही यावेळी दिली. बोगस सभासद करणे, सभासदांना अक्रियेशील ठरवणे ही वाटचाल विरोधकाची खाजगीकरणाच्या दिशेने असल्याचे सांगून त्यासाठी आमच्या संस्थापक पॅनेलच्या पाठिशी उभे रहा.
यावेळी सभासद जयवंत खबाले, बाळकृष्ण माने, वसंतराव भोसले, यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ यावेळी झाला. कोरोनाच्या संकटामुळे प्रचारसभा होणार नसल्याने फेसबुक वॅाटस्अॅपसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्थापक पॅनेलचे कार्य सभासदापर्यन्त पोहचवा, असे आवाहन याप्रसंगी विकास खबाले यांनी केले. माजी संचालक सर्जेराव लोकरे, सुभाष पाटील, संदीप पवार, अमर खबाले, सदाशिव पवार, राहुल गरूड, आत्माराम देसाई, सुभाष गरूड, कृष्णेचे माजी संचालक वसंत पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासो पाटील, प्रविण देसाई यासह कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. बाबुराव खबाले व प्रसाद माने यांची मनोगत यावेळी झाले.