Wednesday, March 12, 2025
Home ताज्या बातम्या सांगलीतल्या चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क : संजय विभूते

सांगलीतल्या चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क : संजय विभूते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली-मिरज विधानसभेसह जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असणार आहे.अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची मागणी करणार असल्याची माहिती विभूते यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी सुरू झाली आहे. राज्यात भाजप-सेनेची युती आहे.
जागावाटपाचा फार्मूला जवळपास निश्चित असलं तरी कोणती जागा कुणाच्या वाट्याला कोणता मतदार संघ अजून निश्चित झालेलं नाही. पण सांगली जिल्ह्यातल्या आठ मतदारसंघापैकी चार मतदारसंघात शिवसेनेने दावा केला आहे. त्याचबरोबर सांगली आणि मिरज मतदार संघाची मागणी केली आहे. सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. जिल्ह्यातील खानापूर विटा तासगाव पोलीस कडेगाव आणि इस्लामपूर वाला पारंपरिक शिवसेनेचे मतदार संघ असून विचार विधानसभेच्या जागीं बरोबर सांगली आणि मिरज विधानसभा मतदार संघही शिवसेनेला मिळावेत अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती विभूते यांनी दिली आहे.
हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे असले,तरी गेल्या निवडणुकीत सांगली विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराला 40 हजारांची मत मिळाली होती.तसेच मिरज मतदार संघ नेहमीच शिवसेनेने लढवला आहे.त्यामुळे सांगली आणि मिरज मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असेल आणि या ठिकाणाहून अनेक जण शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असून ,आपण स्वतः पलूस कडेगाव अथवा तासगाव मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे संजय विभूते यांनी स्पष्ट केले आहे.