घरफोडी करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक, 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील सुंदरनगर येथे राहणारे अरूण जयवंत जगताप यांच्या बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गांधी चौकी पोलिसांनी जलदगतीने तपास करून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रूपये किंमतीची रिक्षा असा एकूण 4 लाख 40 हजार रूपयांचा रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दरोडा प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. त्यापैकी एका आरोपीस गांधी चौकी पोलिसांनी अटक केली असून तिघांना एमआयडीसी हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी ताब्यात दिले आहे.

अरूण जगताप हे हॉटेल व्यवसायिक आहेत. एमआयडीस येथे त्यांचे हॉटेल आहे. अरूण जगताप हे सुंदर नगर येथील प्रतिक्षा बंगल्याला कुलूप लावून पत्नी व त्यांची व मुले हे सर्वजण महाबळेश्र्वरला गेले होते. महाबळेश्र्वरला गेल्यानंतर जगताप यांनी हॉटेल मॅनेजरला घरी जावून पाहून येण्यास सांगितले. मॅनेजर हा जगताप यांच्या सुंदरनगर येथे असलेल्या बंगल्याकडे गेला होता. त्यावेळी त्यांना बंगल्याचे घराचे दरवाजाचे कडीकोयंडा उचकटलेले दिसले.

पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माहिती घेतली असता पोलिसांनी परिसरातील सी.टी.व्ही.फुटेजची माहिती घेतली. त्यानंतर संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनिस अल्ताफ सौदागर, वैभव आवळे, नेहाल मोमीन, समर्थ गायकवाड यांना अटक केली. या चौघांकडून 4 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गांधी चौकी पोलिसांनी हस्तगत केला आहे.