मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हवामान खात्याने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई आणि कोकणातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here