Wednesday, February 8, 2023

परभणी येथे चार लाखांचा गुटखा जप्त

- Advertisement -

परभणी | शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका कारचा पाठलाग करून परभणी पोलीस अधीक्षक तुझ्या विशेष पथकाने तब्बल तीन लाख 99 हजार पाचशे वीस रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक विशाल खोले आणि पोलीस कर्मचारी सय्यद जाफेर,कपिल घोडके ,लटपटे, हुंडेकर, मुंढे यांना चार चाकी वाहनातून गुठखा येत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यातील दुधाटे व जलद कृती दलाला सोबत घेऊन दर्गा परिसरात सापळा रचला. त्यानुसार ते दर्गा रोड परिसरातील सुभेदार नगर गाड्यांची पाहणी करत असता गुटका असलेल्या कार चालकाने पोलिसांना बघितल्या नंतर कार वेगाने पळवली. यावेळी पोलिसांनी त्या कारचा पाठलाग करत कार मध्ये असणारा गुटखा जप्त केला.

- Advertisement -

चालकाने पोलीस पाहिल्यानंतर त्या ठिकाणाहून कार भरधाव वेगाने घेवून गेला. कारचा पाठलाग करून पोलिसांनी कार ताब्यात घेतली. ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली असता कारमध्ये 3 लाख 99 हजार 720 रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत एकूण सहा लाख 10 हजार 52 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात म.साजिद म. इर्दीस, सय्य्द जुनेद, अन्वर अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.