Monday, February 6, 2023

तरुणीला मारहाण करून तीन तासांनी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

मंठा | 11 जुलै रोजी एका तरुणीला घरात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंठा तालुक्यातील ठेंगेवडगाव घडली आहे.

मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी घरात घुसला होता. यानंतर आरोपी त्या मुलीच्या अंगाशी झटू लागला. मुलगी विरोध करत घराबाहेर पळू लागली. हे बघताच आरोपीने त्या मुलीच्या घरातील कुऱ्हाडीचा दांडा काढून मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.दांड्याने केलेल्या मारहाणीमुळे मुलगी गंभीर जखमी झाली असून मी तुझा किती दिवसांपासून पाठलाग करतो आहे, पण तू मला भावच देत नाही, असे म्हणत आरोपीने मुलीचा हाथ धरला.

- Advertisement -

पवन तान्हाजी दांगट असे आरोपीचे नाव आहे. त्या मुलीला घरात घुसून मारहाण केल्यानंतर या आरोपीने तीन तासांनी स्वतःहा गळफास लावून आत्महत्या केली.या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून मंठा येथील पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक पोलीस निरीक्षक तपास नाईक राठोड हे करती आहे.