Sunday, January 29, 2023

एका क्षणात माणसे बनली निर्जीव पुतळा, धक्कादायक Video आला समोर

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला कधी कुठे कसा मृत्यू येईल हे सांगता येऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चार माणसं एकाच वेळी उभ्या उभ्या जिवंत पुतळा झाली आणि जमिनीवर कोसळली (lightning strike). अवघ्या काही सेकंदात चौघांचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, चार लोक एका झाडाखाली उभे आहेत. पाऊस कोसळत आहे. पावसामुळे या चौघांनी झाडाचा आसरा घेतला आणि अचानक त्याच झाडावर वीज कोसळली (lightning strike) आणि चारही जण धाडकन जमिनीवर कोसळले. तीन लोक लगेच जमिनीवर पडले तर चौथी व्यक्ती काही सेकंद पुतळ्यासारखीच उभी होती आणि तशीच्या तशी ती जमिनीवर पडले, अवघ्या काही क्षणात या चौघांचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (lightning strike) आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पावसात झाडाखाली कधीच उभं राहू नये, असं सांगितलं जातं. तरी लोक झाडाखाली जातात. त्याचा किती भयानक परिणाम होऊ शकतो ते या व्हिडिओवरून तुम्हाला समजेल.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?