औरंगाबाद – काल औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा, छावणी, मुकुंदवाडी तसेच वाळूज महानगर या भागात चार जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी छावणी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भावसिंगपुऱ्यात रिक्षा चालकाची आत्महत्या –
भाव्सिंग्पुरा भागातील प्रभात नगर येथील रिक्षाचालक रमेश वाकेकर (56) यांनी 30 ऑगस्ट रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश हे गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होते. यातुनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार हसीना शेख तपास करत आहेत.
छावणीत एकाने घेतला गळफास –
छावणी परिसरातील लिटल फ्लॉवर शाळा परिसरातील एका कॉलनीत राहणाऱ्या कोमलसत्य सत्यजित साठे (56) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहे.
वाळूज महानगरात तृतीयपंथींने घेतला गळफास –
वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी येथील शिवराम बळीराम पोईकर (24) यांनी घरातील लोखंडी रॉबला स्कार्फ बांधून आत्महत्या केली. मात्र यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विठ्ठलनगरात कामगाराची आत्महत्या –
मुकुंदवाडी परिसरातील विठ्ठलनगरतील सुभाष अण्णा नवगिरे (40) या कामगाराने आत्महत्या केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी रविवारी रात्री उशिरा घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.