हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. परंतु, सत्तास्थापनेला काही दिवस उलटत नाहीत तोच 3 आमदारांना अपघाताला सामोरे जाऊ लागले. तर काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी यांच्या समोरच आमदार निवासातील छत कोसळले. यामुळे बंडखोर आमदारांच्या मागे अपघाताचे ग्रहण तरी लागलं नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांचा अपघात-
5 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. मुंबईत असताना हा अपघात झाला पण सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी नाही झाली.
संजय शिरसाठ यांच्या गाडीला अपघात-
तारीख होती 6 जुलै, बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या गाडीला अपघात झाला. संजय शिरसाठ हे औरंगाबाद येथे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी काढलेल्या रॅलीदरम्यान शिरसाटांची गाडी समोरच्या गाडीला धडकली.
शहाजी पाटलांसमोरच खोलीचे छत कोसळले-
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल अशी डायलॉग बाजी करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील 7 जुलै ला मुंबईतील आमदार निवासात असताना शहाजीबापूंच्या समोरच खोलीचं छत कोसळलं. शहाजीबापू यातून अगदी थोडक्यात वाचले.
भरत गोगावले यांचा अपघात-
शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांच्या गाडीला 11 जुलै रोजी अपघात झाला. मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर हा अपघात झाला. यावेळी 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या. मात्र आपण सुखरूप आहोत अस स्पष्टीकरण त्यानंतर भरत गोगावले यांनी दिले.