ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात!! 4 ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू; 10 जण गंभीर जखमी

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूर रत्नागिरी महामार्ग येथील नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 2 वाजता एक मोठी दुर्घटना घडली आहे. (Accident News) याठिकाणी एका ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहाजण जखमी झाली आहेत. मृतांपैकी तीन मजूर हे चिखलगीचे असून एकजण शिरनांदगी येथील आहे. या घटनेनंतर संबंधित मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजता नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ घडली. गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गेले होते. सोमवारी रात्री गळीत हंगामी संपवून सर्व मजूर पुन्हा आपल्या घरी येत होते. परंतु प्रवासादरम्यानच मजुरांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला. यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला. मात्र याचवेळी आंध्रप्रदेशातील ट्रकने मागून येऊन ट्रॅक्टरला धडक दिली.

ट्रकने या ट्रॅक्टरला दिलेली धडक इतकी जोरदार होती की, यामुळे ट्रॅक्टरमध्ये असलेल्या चार मजुरांच्या जागीच मृत्यू झाला. तर इतर मजूर गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी आणि जवळील लोकांनी घटनास्थळी जाऊन घेतली. पुढे जखमी झालेल्या सर्व मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. जिला पुन्हा पोलिसांनी सुरळीत केले.

दरम्यान, मृत व्यक्तींमध्ये दत्तात्रय खांडेकर (वय 30) , जगमा तम्मा हेगडे (वय 35) , दादा आप्पा ऐवळे (वय 17) , निलाबाई परशुराम ऐवळे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यात रोजगाराचे साधन नसल्यामुळे तेथील लोकांना ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. हे मजूर कामासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर अशा भागात येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी या दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर ऊस तोडणीसाठी शिरोळ येथे आले होते. परंतु काम संपवून घरी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.