कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा चारचाकीचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकीने दुचाकीचा जोराची धडक दिली असून सातजण जखमी झाले आहेत. तर चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी झाडावर जावून आदळली आहे. या दुर्घटनेतील तीनजण गंभीर जखमी आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील कोर्टी गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी उशिरा कराड-सातारा लेनवरती हा अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी (क्रमांक एमएच-12-जीएफ-7159) या गाडीचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पुढे चाललेल्या दुचाकी (क्रमांक- एमएच-10-एटी-1026) गाडीला जोराची धडक दिली. त्यानंतर चारचाकी एका झाडावर जावून आदळली.
या अपघातात कारचालक साैरभ दिनकर पाचपुते (वय-25, रा. कराड), दिनकर संपत चाळके (वय- 29, रा. कुंभारगाव), अोकांर गणेश चाळके (वय- 20, रा. कुंभारगाव), प्रिया रामदास भोसले (वय- 22, रा. सातारा), रूपाली शिवाजी लोहार (वय- 22, रा. सातारा) आणि दुचाकीवरील प्रविण विठ्ठल शेळके (वय- 26, रा. पेरले), रामदास दिनकर सुर्यवंशी (रा. कराड) हे सातजण जखमी झालेले आहेत. जखमींना कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.