शिवसेना भवन म्हणजे ‘मस्जिद’ आहे का? मनसेने पुन्हा डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना भवनासमोर मनसे कार्यकर्त्यांनी भोंगा लावत हनुमान चालीसा पठण केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली. त्यांनतर मनसे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा राजकीय सामना रंगला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे

शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? आज रामनवमी निमीत्त सेना भवनबाहेर जर हनुमान चालीसा चे पठाण केले तर यात अचानक काय आहे? शिवसेना भवन हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक पवित्र स्थान आहे. मग त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारला अडचण काय आहे? मस्जिद समोर हनुमान चालीसा लावली तर कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होतो. ठाकरे सरकार हे तालिबानी आहे का? असा सवाल संदिप देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या बाबत केलेल्या विधानानंतर राज्यात वातावरण चिघळले आहे. आज सकाळी मनसेने शिवसेना भवनासमोर एका रथात भोंगा लावून हनुमान चालिसा लावला होता, त्यावर पोलिसांनी कारवाई करत मनसेनं लावलेले भोंगे पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment