सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई शहरात रविवार पेठेत राम डोह आळी, ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची मोडतोड अज्ञात व्यक्तीने केल्याची बाब सकाळी निदर्शनास आली. त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण असून नेमका कोणी प्रकार केला आहे?, वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सुमारे दहा वाहनांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे, याची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.
वाई शहरात रविवार पेठेतल्या नागरिकांची वाहने रात्री घरासमोर लावलेली असतात. त्याच वाहनाच्या काचा फुटल्याचे सकाळी नागरिकांना दृष्टीस पडले. त्यात ओमीनी, स्विफ्ट, अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही असून त्यात हा प्रकार कैद झाला असावा, अशी ही शक्यता व्यक्त होत आहे.
वाई शहरात यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नव्हता. मात्र मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडलेल्या वाहनांच्या काचामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन चालकांचे या घटनेमुळे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. सदरचा प्रकार करणाऱ्या गावगुंडावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांच्यातून केली जात आहे.